बातम्या आणि घडामोडी

क्रमांकबातम्या आणि घडामोडीदिनांकडाऊनलोड
1 राज्याच्या रिसोर्स बँकेचे आदिवासी शेतकऱ्यांचे हस्ते उद्घाटन: यापुढे प्रगतशील शेतकरीही करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन- कृषी मंत्री दादाजी भुसे. राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी कृषी संजीवनी सप्ताह निमित्ताने कृषी योजना व कृषी तंत्रज्ञानाचा जागर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्यासाठी आदिवासी बहुल पांढरकवडा तालुक्यातील मौ. खैरगांव( दे) जि.यवतमाळ येथील आदिवासी शेतकरी श्री महेंद्र दौलत नैताम यांचे शेतावर भेट दिली.यापुढे राज्यातील नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे प्रगतशील शेतकरीच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करुन निव्वळ उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याचे कृषी मंत्री यानी सांगितले. याचाच भाग म्हणून राज्यातील 3606 प्रगतशील शेतकऱ्यांची रिसोर्स बँकेचे उद्घाटन आदिवासी शेतकरी महेंद्र दौलत नैताम यांचे हस्ते बांधावर करण्यात आले.कार्यक्रमासाठी राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड,वसंतराव नाई शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी , जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, माजी आमदार विश्वास नांदेकर,कृषी विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड,तालुका कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने व तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. उत्पादन खर्च कमी करुन ,उत्पादन व गुणवत्ता वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करुन शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढावे यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवा अशा सुचना कृषी मंत्री तथा माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. तालुका कृषी अधिकारी पांढरकवडा जि.यवतमाळ. 07/07/2020 PDF