दुधी भोपळा ही वेलवर्गीय भाजी असून दुधी भोपळयाचा भाजी म्हणून आहारात उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त दुधी भोपळयापासून दुधी हलवा हा पदार्थ बनविला जातो. प्रत्येक वेलीवर नर आणि मादी अशी वेगवेगळी फूले असतात. त्यापैकी फक्त फुांनाच फळधारणा होते. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली सरासरी 566 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.
दुधी भोपळयाची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात केली जाते. हे पिक उष्ण आणि कोरडया हवामानात उत्तम येते. मध्यम ते भारी जमिनीत हे पिक उत्तम येते.
मे ते जून महिन्यात या पिकाची लागवड केली जाते. हेक्टरी 3 ते 6 किलो बियाणे लागते.
शेतास उभी आडवी नांगरट करुन ढेकळे फोडून काढावीत. नंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 30 ते 35 गाडया टाकावे. व नंतर वखराची पाळी दयावी. दुधी भोपळयाची लागवड करण्यासाठी 3 मी. अंतरावर 60 सेमी रुंदीचे पाट काढावेत पाटाचे दोन्ही बाजूस 30 × 30 × 30 सेमी आकाराचे 1 मी. अंतरावर खडडे तयार करावेत. प्रत्येक खडडयात 3 ते 5 किलो शेणखत टाकून मातीत मिसळावे. नंतर प्रत्येक आळयात 3 ते 4 बिया टाकाव्यात.
पुसा समर प्रॉली फिक लॉग - या जातीची कोवळी फळे 40 ते 50 सेमी लांबीची आणि 20 ते 25 सेमी जाडीची असतात. फळांचा रंग पिवळसर हिरवा असतो. या जातीचे हेक्टरी उत्पादन 110 ते 120 क्विंटल असते.
पुसा समर प्रॉलीफिक राऊंड - या जातीची फळे हिरवी गोल आकाराची 15 ते 20 सेमी जाडीची असतात. ही जात उन्हाळी हंगामासाठी चांगली असून या जातीचे हेक्टरी उत्पादन 90 ते 100 क्विंटल असते.
पुसा नविन - या जातीची फळे 25 ते 30 सेमी लांबीची व 5 ते 6 सेमी व्यासाची असतात. फळाचे सरासरी वजन 700 ते 900 ग्रॅम पर्यंत असते. ही जात लवकर येणारी असून सरासरी हेक्टरी उत्पादन 150 ते 170 क्विंटल असते.
पंजाब कोमल - या जातीचे फळे 40 ते 45 सेमी लांबीची 5 त े6 सेमी व्यासाची असतात. फळांचे सरासरी वजन 1 ते दीड किलोपर्यंत असते. या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 130 ते 140 क्विंटल प्रति हेक्टरी असते.
सम्राट - विद्यापीठाने शिफारस केलेला वाण - उत्पादन दुधी भोपळयाचे जातीनुसार हेक्टरी 170 ते 200 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
दुधी भोपळयास लागवडीपूर्वी 50 किलो नत्र 50 किलो स्फूरद, लागवडीपूर्वी द्यावे. 50 किलो प्रति हेक्टर नत्राचा दुसरा हप्ता लागवडीनंतर 30 ते 40 दिवसाच्या अंतराने द्यावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी दयावे.
दुधी भोपळयाचे पिक मांडवावर चढविणे गरजेचे असल्याने बांबूच्या सहायाने तयार केलेल्या मांडवावर योग्य त्या आधाराच्या साहायाने वेल वाढतील तसे चढवावे. उन्हाळी हंगामात वेलांची वाढ कमी असल्यामुळे ते जमिनीवर सोडले तरीही चालतात. पिकामध्ये गवताचे प्रमाण वाढलेले निदर्शनास येताच खुरपणी करून तण काढून टाकावेत.