सन 2007-08 मध्ये दि. 30/11/2007 च्या शासन निर्णयान्वये गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे. याच शासन निर्णयान्वये कार्यक्रमांतर्गत सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने सन 2007-08 ते 2010-11 पर्यत 3818 पाणलोटांना मान्यता दिली. त्यानंतर समितीच्या अध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिल्याने शासनाने मा. आयुक्त कृषि यांचे अध्यक्षतेखाली तात्पुरत्या स्वरुपातील सुकाणू समितीची स्थापना केली. या समितीने सन 2011-12 ते 2016-17 पर्यंत 5140 पाणलोटांना मान्यता दिली. म्हणजेच समितीने एकूण 8958 पाणलोटांना मान्यता दिली.
मान्यता दिलेल्या 8958 पाणलोटांपैकी 3390 पाणलोट पूर्ण झाले आहेत. याबाबतचा सभानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.