नागरिकांची सर्वसाधारण माहिती

1.प्रस्तावनाः-

कृषि व पदुम विभागाच्या अधिपत्याखाली कृषि आयुक्तालय कार्यरत आहे. सदर आयुक्तालयामार्फत कृषि विषयक ध्येय-धोरण, अंमलबजावणी व शेतक-यांना शेतीच्या कामासाठी आर्थिक व वस्तु स्वरूपात मदत देण्याचे प्रामुख्याने काम करण्यात येते. त्यासाठी 5 विभागाची रचना केली असून, त्याच्यामार्फत कामाच्या विभागणीप्रमाणे कामे करण्यात येतात. महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील कलम-8 मधील तरतूदीनुसार कृषि व पदुम विभाग (कृषि) नागरिकांची सनद प्रसिध्द करीत आहे. कृषि आयुक्तालय या कार्यालयाशी संबंधित असणा-या अधिकारी/कर्मचा-यांनी सेवा तत्परतेने, सौजन्यपूर्वक व सन्मानपूर्वक नागरिकांनां उपलब्ध करून देण्यासाठी कृषि आयुक्तालय बांधिल राहिल.

2.कृषि आयुक्तालयाची रचना :-

आयुक्त (कृषि) व संचालक (5), विभागीय कृषि सहसंचालक (8), कृषि सहसंचालक, कृषि आयुक्तालय, पुणे (6), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (33), उप विभागीय कृषि अधिकारी (90), तालुका कृषि अधिकारी (351), मंडळ कृषि अधिकारी (885), याप्रमाणे अधिकारी वर्ग सद्यःस्थितित कार्यरत आहे.

3.कार्यपूर्तिचे वेळापत्रक :-

महाराष्ट्र शासकीय कर्मचा-य़ांचे बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम 11 मध्ये नमूद केलेल्या न्याय प्रविष्ठ बाबी लोक आयुक्त किंवा उपलोकआयुक्त आणि अन्य घटनात्मक संस्था, आयोग, न्यायिकवत बाबी, केन्द्र किंवा अन्य राज्य शासनाच्या संबंधातील प्रकरणे, विधि विभागाशी संबंधित बाबी, मंत्रीमंडळास सादर होणा-या मुख्य धोरणात्मक बाबी इत्यादिंना कार्यपूर्तिच्या वेळापत्रकातील वेळापत्रकातून सूट राहील.

4.(अ) गा-हाणी/तक्रारी यांचे निराकरणः-

कार्यपूर्तिस होणारा विलंब व अन्य काही गा-हाणी असल्यास त्यासंबंधी परिच्छेद-5 मध्ये नमूद केलेल्या अधिका-यांकडे तक्रार नोंदविता येईल व तक्रार प्राप्त झाल्यापासून 7 दिवसांत त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित अधिका-याची राहिल. याउपरही नागरिकांचे समाधान न झाल्यास विभागीय कृषि सहसंचालक/ आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे यांचेकडे याबाबत त्यांना तक्रार करता येईल.

(ब) नागरिकांच्या सनदेचा आढावाः-

या सनदेच्या उपयुक्तते बाबतचा तथा परिणामकारकतेचा आढावा आयुक्त (कृषि) यांच्याकडून दरवर्षी घेण्यात येईल व त्यात आवश्यकतेनुसार बदल कृषि विभागाच्या मान्यतेने करण्यात येतील.

(ई) जन सामान्यांकडून सूचनाः-

ही नागरिकाची सनद सर्वसामान्य नागरिकाच्या छाननीसाठी नेहमीच खुली असेल व सन्माननीय नागरिकांच्या बहुमूल्य सूचनांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यात वेळोवेळी सुधारणा घडवून आणता येतील. तसेच या विभागाच्या अधिनस्त येणा-या सेवा उपभोगणा-या नागरिकांना आपले हक्क मांडण्यासाठी ही सनद नेहमीच सहकार्य करीत राहील.

5.नियम/परिपत्रक व नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी

या सनदेची अंमलबजावणी दि. 1 जानेवारी, 2007 पासून करण्यास कृषि आयुक्तालय कटिबद्ध आहे. सनदेस व्यापक प्रसिद्धि देवून नागरिकांच्या प्रतिक्रिया/ अभिप्राय त्यांच्या सूचनांचा यथोचित आदर करून आवश्यक बदल करण्यात येतील. सदर परिपत्रक तथा शासन निर्णयाची माहिती htpp://mahaagri.gov.in या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात येते