जैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम

जैविक बांध / फांदी बांध/ ब्रशवुड डॅम

लाईव्ह चेक डॅम टाकल्यानंतर त्यापुढे ओघळ मोठी असेल त्या ठिकाणी ब्रश वुड डॅम टाकावे. ओघळीच्या रुंदी एवढया लांबीवर 20 सें.मी. अंतरावर 5 सें.मी. व्यासाची व 60 ते 65 सें.मी. लांबीच्या वाळलेल्या किंवा ओल्या लाकडाच्या खुंटया रोवावी. अशा खुंटीच्या दोन रांगा लावाव्यात. दोन रांगामध्ये 20 सें.मी. अंतर ठेवावे. खुंटयाच्या दोन रांगामध्ये गवत, कडबा, काटेरी झुडुपांच्या फांद्या इत्यादि ठेवाव्यात व त्यावर दगड किंवा माती टाकावी. यामुळे फांद्या तिथेच टिकून राहतील.

या ब्रशवुड डॅममुळे पाण्याची गती कमी होईल व त्यामुळे माती साचेल व पाणी संथ गतीने निघून जाईल. ब्रशवुड डॅमचा आकार शेत परिस्थितीप्रमाणे ठरवावा लागेल व त्यानुसार त्यांचे संकल्पचित्र व अंदाजपत्रक तयार करुन त्याला सक्षम अधिका-यांची मान्यता घ्यावी. यासाठी केंद्र शासनाने प्रति ब्रश वुड डॅमसाठी जास्तीत जास्त 150/- एवढया खर्चाची मर्यादा आहे.