कंपार्टमेंट बंडींग

कंपार्टमेंट बंडींग

नियोजन विभाग शासन निर्णय क्र.रोहयो 2004/प्र.क्र.213/रोहयो-6/दि. 7 जानेवारी 2005 अन्वये रो.ह.यो अंतर्गत शेतकऱ्याच्या खाजगी जमिनीवर पाणलोट विकास कार्यक्रमातंर्गत मृद संधारणाचा परिणामकारक उपचार म्हणून राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये वहितीखालील क्षेत्राची बांध बंदिस्ती केली जाते.

जागा निवडीचे निकष-

  • हा उपचार पाणलोटाचा नियमित उपचार म्हणून राबविण्यात येतो.
  • बांधबंदिस्ती न झालेल्या व झालेल्या अशा दोन्ही क्षेत्रात सदरची योजना राबविण्यात येते.
  • वार्षिक सरासरी पर्जन्यमान 750 मि.मि. पर्यंत असलेल्या भागातच प्राधान्याने ही योजना राबविण्यात येते.
  • सदरची योजना 4 टक्के उतारापर्यंतच्या क्षेत्रावरच राबविण्यात येते.
  • ज्या ठिकाणी सीसीटी किंवा टीसीएम ही कामे झाली आहेत त्या क्षेत्रावर हा उपचार घेतला जात नाही.
  • कामासाठी निवडलेले क्षेत्र कोणत्याही परिस्थितीत विखुरलेल्या स्वरुपात असू नये. यासाठी सलग असलेल्या किमान 50 हेक्टर क्षेत्राचा एक गट तयार करून काम पूर्ण केले जाते.

बांधाचा संकल्पचित्र

1. 0 ते 4 उतार व हलकी जमीन

2. 0 ते 4 उतार व मध्यम जमीन

3) 0 ते 4 उतार व भारी जमीन

तांत्रिक निकष -

उतार गट जमिनीचा प्रकार तांत्रिक मापदंड
पाया रूंदी मी. बांधची उंची मी. माथा रूंदी मी. बाजू उतार बांधाचा काटछेद चौ.मी बांधाची लांबी मी. सांडवा संख्या
0 0 0 ते 4 उतार व हलकी जमीन 1.80 0.75 0.30 1:1 0.80 200 3
0 ते 4 उतार व मध्यम जमीन 2.00 0.85 0.30 1:1 1.00 200 3
0 ते 4 उतार व भारी जमीन 2.25 0.90 0.45 1.25:1 1.20 200 3

बंडींगच्या भरावावर हरळीचे वा इतर गवत (हेमाटा, मारवेल इ.) शेतक-यांनी स्वत: लावण्याबाबत त्यांना प्रवृत्त करुन मार्गदर्शन करण्यात येते. बंडींगच्या भरावास पाणी शिंपडण्याची/दबाईची गरज नाही. खोदलेली सर्व माती बांधासाठीच वापरण्यात येते.

हा उपचार राबविण्यासाठी प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे ठरविण्यात येतो.

  • हलकी जमिन
  • मध्यम जमिन
  • भारी जमिन

वरील प्रकारची कामे ही प्रामुख्याने अकुशल स्वरुपाची आहेत, व रोहयोच्या माध्यमातून राबविण्यास अनुकूल असल्यामुळे कुशल / अकुशल निकष पडताळण्याची गरज नसते.

कंपार्टमेंट बंडिगच्या बांधासाठी पाणीसाठा 0.30 मी. धरण्यात आला असल्यामुळे सांडवा उंची मुख्य बांधापासून 0.30 मी ठेवण्यात येते व त्याप्रमाणे पूरपातळी 0.20 मी ठेवण्यात येते. उतारास आडवे असलेल्या बांधास मुख्य बांध संबोधले जाते व उतारास उभे असलेल्या बांधास बाजू बांध संबोधले जाते.

सांडव्यासाठी दोन पर्याय ठेवण्यात येतात. एकतर बाजू बांधाची माथा पातळी मुख्य बांधाच्या माथा पातळी इतकीच ठेवून, बाजू बांध चढाच्या दिशेने 60 से.मी. उंचीपर्यतच घेऊन 30 से.मी. पाणीसाठा ठेवून, 30 से.मी. खोलीचा सांडवा काढून किंवा मुख्य बांधास सोईस्कर ठिकाणी व.30 मी. उंचीवर सांडव्यासाठी 6 इंच व्यासाचा पी.व्ही.सी. पाईप बसवला जातो.