समतल मशागत

समतल मशागत

उतारावरील शेतामधून पावसाचे पाणी जागीच न मुरता ते वाहून जाते व सोबत माती वाहून नेते. त्यामुळे जमिनीची धूप होऊन उत्पादनात घट होते ते टाळण्यासाठी उताराला आडवे असे कंटूरवर मशागत व पेरणी केल्यास पावसाचे पडणारे पाणी जागीच मुरते व वाहून जाणा-या मातीला अटकाव होतो. ही अत्यंत कमी खर्चाची व अत्यंत उपयुक्त उपचार पध्दती असल्यामुळे पाणलोट मोठया प्रमाणात राबविणे सहज शक्य आहे. शेतक-यांच्या शेतावर कायम स्वरुपी मार्गदर्शन रेषा काढून दिल्यास शेतकरी दर वर्षी त्यात मशागत व पेरणी करु शकतात.