समतल सरी

समतल सरी

अवर्षण प्रवण क्षेत्रात व ज्या तालुक्यातील पाणलोटात 750 मी.मी. पेक्षा कमी पाउसमान आहे, तसेच त्या पाणलोटातील जमिनी किंवा ज्या शेतक-याच्या जमिनी उथळ व मध्यम प्रकारच्या आहेत अश शेतक-यांच्या शेतावर हा कार्यक्रम राबवावा. पिकाची पेरणी समपातळीत किंवा उताराला आडवी करावी, व पिकांच्या ओळीमध्ये नांगराचे एक तास काढावे. यामुळे पावसाचे पाणी शेतात सर्व दूरवर अडून राहील. हे काम शेतक-यांनी स्वत: त्याच्या खर्चाने करावयाचे आहे. आपण शेतक-यांना याबाबतीत त्यांचा मानसिक तयारी करण्याच्या दृष्टीने त्यांना उद्युक्त करणे व हे काम करण्यासाठी लेव्हल्स काढून देणे यापुरते सहाय्य करावयाचे आहे.