रासायनिक खते चाचणी प्रयोगशाळा

राज्यातील खत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण

शेतक-यांना उपलब्ध होणा-या निविष्ठा योग्य दर्जाच्या असणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. निविष्ठांचे उत्पादन, साठवण, पुरवठा, विक्री इत्यादींचे नियमन करण्यासाठी केंद्र शासनाने विविध कायदे संमत केलेले आहेत. खताची गुणवत्ता तपासणीसाठी खत (नियंत्रण) आदेश, 1985 हा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी करिता खताची गुणवत्ता तपासणी वेगवेगळया स्तरावर आवश्यक ठरवलेली आहे. त्यासाठी खत विश्लेषण प्रयोगशाळा स्थापित करण्यात आलेल्या आहेत.

राज्यामध्ये गुणवत्ता नियंत्रणा अंतर्गत एकूण 5 प्रयोगशाळा आहेत. सदर प्रयोगशाळा पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. यापैकी 4 प्रयोगशाळेस एन.ए.बी.एल. मानांकन प्राप्त आहे. 

अ.क्र. खत नियंत्रण प्रयोग शाळा स्थापनेचे वर्ष प्रयोगशाळेचे नांव, पत्ता व दुरध्वनी क्रमांक क्षमता कार्यक्षेत्र जिल्हे एन.ए.बी.एल. मानांकन
1 2 3 4 5 6 7
1 पुणे 1959-60 खत नियंत्रण चाचणी प्रयोगशाळा, पुणे कृषि भवन,शिवाजीनगर, पुणे-5 दु.क्र.020-25513651 4830 पुणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, प्राप्त
2 नाशिक 1983-84 खत नियंत्रण चाचणी प्रयोगशाळा, नाशिक उंटवडी रोड, संभाजी चौक, नाशिक दु.क्र.0253-2314032 4830 नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार, रायगड, ठाणे. प्राप्त
3 औरंगाबाद 1981-82 खत नियंत्रण चाचणी प्रयोगशाळा, औरंगाबाद, कृषि अभियांत्रिकी कार्यशाळा, शाहनुरमियाँ दर्गारोड, औरंगाबाद दु.क्र.0240-2332157 4830 औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम प्राप्त
4 अमरावती 1978-79 खत नियंत्रण चाचणी प्रयोगशाळा, अमरावती, तपोवन रोड, कॅम्प, अमरावती -444603 दु.क्र.0721-2662764 4830 नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला,यवतमाळ. प्राप्त
5 कोल्हापूर 2010-11 खत नियंत्रण चाचणी प्रयोगशाळा, कोल्हापूर, प्लॉट नं.6 श्री शाहू मार्केटयार्ड, स्टेट बँके शेजारी, कोल्हापूर-416 005 दु.क्र.0231-2666220 2680 कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी कार्यवाहीत
एकूण 22000      

या प्रयोगशाळेत मुख्यत: खत निरीक्षकांनी क्षेत्रीय स्तरावरील काढलेल्या नमुन्यांचे विश्लेषण केले जाते तथापी शेतक-यांसाठी खत चाचणी प्रयोगशाळांमध्ये खालील प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.

  • शेतक-यांनी खरेदी केलेल्या रासायनिक खताबद्दल त्यांना शंका असेल तर अशा खताचे विश्लेषण या प्रयोगशाळेत करुन मिळते, त्यासाठी प्रति घटक रुपये 50/- प्रमाणे फी आकारली जाते.
  • शेतक-यांनी स्व-उत्पादीत केलेले/विकत घेतलेल्या कोणत्याही प्रकारच्या खताचे उदा. सेंद्रिय खत (गांडूळ खत) विश्लेषण करुन मिळते व त्यासाठी प्रति घटक रुपये 50/- प्रमाणे फी आकारली जाते.

याशिवाय शिसे, जस्त, तांबे, मँगनिज, मॅग्नेशियम, बोरॉन, मॉलीब्डीनम, लोह तसेच नत्र, स्फुरद, पालाश, सल्फर,, कॅल्शियम, ॲशचे प्रमाण, सी.एन.प्रमाण, ऑरगॅनिक मॅटर, आर्द्रता, सोडीयम इत्यादी घटकांचे विश्लेषण करण्याची सुविधा या प्रयोगशाळेत उपलब्ध आहे

तसेच खत निरीक्षकामार्फत काढण्यात येणा-या जैविक खतांची उदा. रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, फॉस्फेट विरघळविणारे जिवाणू (P.S.B.) इत्यादीची तपासणी करण्यात येते. जिल्हा परिषद /पंचायत समिती मार्फत शेतक-यांना अनुदानावर वाटप करण्यात येणा-या जिवाणू खतांचे नमुने विश्लेषणासाठी व गुणवत्ता तपासणीसाठी पाठविले जातात. शेतक-यांनी स्वत: खरेदी केलेल्या जिवाणू खतांचे विश्लेषण या प्रयोगशाळेत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी शुल्क रुपये 50/- एवढे आकारण्यात येते.

प्रयोगशाळेत मागील 5 वर्षात तपासणी केलेल्या नमुन्यांची माहिती.

वर्ष क्षमता (संख्या) प्राप्त (संख्या) तपासणी (संख्या) अप्रमाणित (संख्या) अप्रमाणित प्रमाण
2012-13 18000 17579 16939 2827 16.10
2013-14 18000 17876 17422 2720 15.61
2014-15 18000 17367 17117 2257 13.20
2015-16 18000 16813 16662 2212 13.28
2016-17 18000 15399 15329 2703 17.63

सदर प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेंअंतर्गत सन 2016-17 मध्ये उपलब्ध झालेल्या अनुदानातून एन.ए.बी.एल. (आय.एस.ओ. : 17025/2005) मानांकन, उपकरणांची क्षमतावृध्दी, उपकरणे, संदर्भीय रसायने व काचपात्रे, प्रयोगशाळांचे गौणबांधकाम, प्रयोगशाळांचे विद्युतीकरण ई. बाबीवर खर्च करण्यात येत आहे.

RKVY अंतर्गत प्रयोगशाळानिहाय झालेल्या सन 2016-17 खर्चाची माहिती पुढीलप्रमाणे. (र.रु. लाखात)

अ.क्र. प्रयोगशाळेचे नांव साध्य
1 खत नियंत्रण प्रयोगशाळा, पुणे 14.80
2 खत नियंत्रण प्रयोगशाळा, नाशिक 13.06
3 खत नियंत्रण प्रयोगशाळा, औरंगाबाद 13.66
4 खत नियंत्रण प्रयोगशाळा, अमरावती 12.80
5 खत नियंत्रण प्रयोगशाळा, कोल्हापूर 16.35
6 आयुक्तालयस्तर 29.33
  एकूण 100.00

सदर योजनांतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून सदर प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात आल्यामुळे प्रयोगशाळेत खालीलप्रमाणे कार्यवाही करणे शक्य झालेले आहे.

  • प्रयोगशाळेतील एकूण 39 विश्लेषकांपैकी 11 विश्लेषकांची पदे कमी (28 टक्के) होऊनही प्रयोगशाळेची विश्लेषण क्षमतेत वाढ.
  • पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती येथील प्रयोगशाळांना एन.ए.बी.एल. (आय.एस.ओ.:17025/2005) मानांकन प्राप्त.
  • मिश्र खत उत्पादकांचे नमूने शिघ्रतेने तपासणी करणे शक्य झाल्याने खत पुरवठा सुरळीत व वेळेवर होण्यास मदत.
  • आधुनिक उपकरणामुळे तपासणीत अचूकता वाढल्याने शेतक-यांना दर्जेदार खत मिळण्यास मदत.

पुढील तीन वर्षाचे नियोजन

  • कोल्हापूर प्रयोगशाळेसä‎ एन.ए.बी.एल. (आय.एस.ओ.:17025/2005) ये मानांकन घेणे.
  • उपलब्ध मनुष्य बळावरच आधुनिक उपकरणाव्दारे प्रयोगशाळांची क्षमतावृध्दी करणे.