बियाणे परीक्षण प्रयोगशाळा

राज्यातील बीज परिक्षण प्रयोगशाळा

शेतक-यांना उपलब्ध होणा-या निविष्ठा योग्य दर्जाच्या असणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. निविष्ठांचे उत्पादन, साठवण, पुरवठा, विक्री इत्यादींचे नियमन करण्यासाठी केंद्र शासनाने विविध कायदे संमत केलेले आहेत. बि-बियाणे अधिनियम, 1966 बियाणे नियम, 1968, बियाणे (नियंत्रण) आदेश,1983 या कायद्याच्या अंमलबजावणी करीता विविध बियाणे नमुन्यांची गुणवत्ता तपासणी वेगवेगळ्या स्तरावर आवश्यक ठरवलेली आहे. त्यासाठी संबंधित कायद्यांतर्गत प्रयोगशाळा स्थापित करण्यात आलेल्या आहेत.

राज्यामध्ये बि-बियाणे तपासणीसाठी पुणे, परभणी व नागपूर या ठिकाणी बीज परिक्षण प्रयोगशाळा स्थापित करण्यात आलेल्या आहेत.

शासनाच्या या तीन प्रयोगशाळांव्यतिरीक्त महाराष्ट्र राज्यात बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या अधिपत्याखाली औरंगाबाद व अकोला येथे दोन बीज परिक्षण प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

बिज परिक्षण प्रयोगशाळा :-

कोणत्याही पिकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी अधिक उत्पादन देणा-या संकरित, सुधारित जातींची लागवड करावी लागते. तसेच पेरणीसाठी वापरावयाचे बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. या मुलभूत बाबींचा विचार करून सन 1966 च्या दरम्यान पिकांच्या नवीन जातींच्या पैदाशीबरोबरच दर्जेदार बियाणे शेतक-यांना उपलब्ध होण्यासाठी शासनाने बियाणे कायदा करून त्या अंतर्गत बियाणे प्रमाणिकरण यंत्रणा, बीज परिक्षण प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत.

पेरणीसाठी प्रमाणित बियाणे वापरणे अतिशय योग्य, तथापि सुधारित जातींचे सत्यप्रत बियाणे अनेक बियाणे उत्पादक कंपन्या उपलब्ध करून देतात. या सत्यप्रत बियाण्याच्या बाबतीत त्याच्या दर्जाची हमी उत्पादकाने खरेदीदाराला दिलेली असते. यावर विसंबून शेतकरी बाजारातून बियाणे खरेदी करतात. याशिवाय शेतकरी आपले चांगले बियाणे पुढील हंगामासाठी राखून ठेवतात, प्रसंगी ते इतरांनाही विकत देतात. सामान्यत: शेतक-यांनी इतर शेतक-यांना देऊ केलेल्या बियानांची प्रत प्रयोगशाळेत तपासणी झालेली नसते. या बियाणांच्या दर्जाबाबत कोणतीही खात्री दिलेली नसते केवळ एकमेकांच्या विश्वासावर हे बियाणे खरेदी केले जाते, म्हणून अशा बियाणांची पेरणीपुर्वी तपासणी करणे आवश्यक आहे.

बियाणे कायदा 1966, कलम 4(2) अन्वये राज्यातील बिजपरिक्षण प्रयोगशाळा अस्तित्वात आलेल्या आहेत. राज्य शासनाच्या अधिपत्याखाली पुणे, औरंगाबाद, परभणी, अकोला व नागपूर येथे बीज परिक्षण प्रयोगशाळा अस्तित्वात होत्या. त्यापैकी औरंगाबाद व अकोला येथील बिजपरिक्षण प्रयोगशाळा बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत. सध्या पुणे, परभणी व नागपूर येथील प्रयोगशाळा कृषि विभागाच्या अखत्यारीत आहेत. सदर प्रयोगशाळांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र बीजपरिक्षण प्रयोगशाळा स्थापनेचे वर्ष प्रयोगशाळेचे नांव व पत्ता व दूरध्वनी क्रमांक क्षमता जिल्हे एन.ए.बी.एल./इस्टा मानांकन
TYPE SAMPLE CAPACITY

1

2

3

4

5

6

7

8

1

Seed Testing Laboratory,

Pune

Krishi Bhavan, Shivajinagar, Pune

Pin -411005

(020)

25536449

seedlab@

rediffmail.

com

ACT

8200

Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Pune, Ahmednagar, Solapur, Kolhapur, Satara, Sangli, Nashik, Dhule, Nandurbar, Jalgaon,  District.

NABL Accreditated

CERT/REVALIDATION

6000

SERVICE /TRUTHFUL

3900

TOTAL

17920

2

Seed Testing Laboratory,

Parbhani

Laxminagar, Juna Pedgaon road, Near Jayakwadi Canal, Parbhani

Pin - 431401

(02452)

242976

prb_stopbn@ rediffmail.

com

ACT

4905

Latur, Parbhani, Hingoli, Nanded, Aurangabad, Jalna , Osmanabad , Beed,    District

NABL Accreditated and ISTA membership

CERT/REVALIDATION

8400

SERVICE /TRUTHFUL

3885

TOTAL

17190

3

Seed Testing Laboratory,

Nagpur

Agriculture College Campus, Maharaj bag, Nagpur

Pin -440001

(0712)

2564213

Seed_nagpur@yahoo.in

ACT

7890

Nagpur, Wardha, Bhandara,  Chandrapur, Gondia, Gadchiroli, Amravati, Buldhana, Akola, Yavatmal, Washim District.

NABL Accreditated

CERT/REVALIDATION

6000

SERVICE /TRUTHFUL

4000

Total

17890

Total

ACT

20815

MAHARASHTRA STATE

 

CERT/REVALIDATION

20400

SERVICE /TRUTHFUL

11785

Total

53000

वरील सर्व प्रयोगशाळांमध्ये शेतक-यांकडून पाठविण्यात येणारे बियाणांचे नमुने विश्लेषण करून त्यांचे अहवाल पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. कृषि विभागाकडूल प्रयोगशाळांमध्ये शेतक-यांच्या बियाणे नमुन्याबरोबरच बियाणे कायद्यांतर्गत बियाणे निरिक्षकांनीं काढलेले नमुने तसेच बिजप्रमाणीकरण यंत्रणेने पाठविलेले नमुनेही तपासले जातात. कायद्यांतर्गत पाठविलेल्या नमुन्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही. प्रमाणिकरण व शेतक-यांच्या नमुन्यांना नाममात्र शुल्क आकारले जेते. सध्या ते केवळ रुपये 40/- प्रति नमुना असे आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावयाच्या नमुन्याबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

प्रयोगशाळेमध्ये प्रामुख्याने बियाण्याची भौतीक शुद्धता व उगवण शक्ती तपासली जाते. कायद्यांतर्गत काढलेल्या नमुनांची आवश्यकतेनुसार अनुवंशिक शुद्धताही तपासता येते. बियाणातील आर्द्रता, ओलावा, स्वास्थ्य या बाबी देखील तपासता येतात. बियाणे उत्पादनामध्ये योग्य ती काळजी घेऊन अनुवंशींक व भौतीकदृष्ट्या शुद्ध बियाणे पुरविण्याची जबाबदारी उत्पादकाची आहे. यासाठी वरील प्रत्येक बाबतीत पीक निहाय प्रमाणके शासनाने ठरवून दिलेली आहेत. त्याप्रमाणे बियाणे असल्याची खात्री करून तसे लेबल व सील लावण्याचे कायदेशीर बंधन उत्पादकांवर आहे.

बीटी कापूस बियाणे तपासणिची सुविधा बीज परिक्षण प्रयोगशाळा पुणे परभणी व नागपूर येथे उपलब्ध आहे.

प्रयोगशाळेत मागील 5 वर्षात केलेली कार्यवाही.

अ.क्र वर्ष वार्षिक तपासणी क्षमता प्राप्त नमुने तपासलेले नमुने अप्रमाणित नमुने अप्रमाणित नमुन्यांचे प्रमाण
1 2012-2013 48000 39816 38319 3416 8.91
2 2013-2014 48000 37892 37740 4847 12.84
3 2014-2015 48000 41471 39782 7040 17.70
4 2015-2016 48000 34243 33545 2939 8.76
5 2016-2017 48000 34524 33117 2353 7.11

उपरोक्त माहितीचे अवलोकन केले असता राज्यातील तीनही प्रयोगशाळेकडे मागील पाच वर्षात वार्षिक तपासणी क्षमतेएवढे नमुने प्राप्त झालेले नाहीत.

RKVY अंतर्गत प्रयोगशाळानिहाय झालेल्या सन 2016-17 खर्चाची माहिती पुढीलप्रमाणे.

(Rs. Lakh)

 
अ.क्र. प्रयोगशाळेचे नांव साध्य
1 बीज परिक्षण प्रयोगशाळा, पुणे 11.54
2 बीज परिक्षण प्रयोगशाळा, परभणी 25.67
3 बीज परिक्षण प्रयोगशाळा, नागपूर 20.75
4 आयुक्तालयस्तर 42.04
एकूण 100.00

बियाणे जनुकीय तपासणी सुविधा :-

१. बीज परिक्षण प्रयोगशाळा पुणे, परभणी व नागपूर येथे बियाणांची जनुकीय तपासणी करण्याची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. त्य़ामुळे बियाण्यांची अनुवंशिक शुद्धता तपासण्यासाठी लागणारा कालावधी (50 ते 100 दिवस) कमी होऊन सदर सुविधेमुळे त्याऐवजी चार दिवसांमध्ये तपासणी करणे शक्य होणार आहे. त्याकरीता राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत प्राप्त निधीतून सदर प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आलेली आहे. सदर प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आलेल्या सुविधामध्ये प्रयोगशाळा गौण बांधकाम, विद्युतीकरण, उपकरणे खरेदी या बाबींचा समावेश आहे.

पुढील तीन वर्षाचे नियोजन

  • बीज परिक्षण प्रयोगशाळा, पुणे/परभणी येथे ईस्टा नॉर्म प्रमाणे अद्यावत अंकुरण कक्ष निर्माण करणे.
  • बीज परिक्षण प्रयोगशाळा, परभणी येथे स्वतंत्र जनरेटर रूमची निर्मीती करणे.
  • गुणवत्ता नियंत्रणासाठी तपासणी करीता येणा-या नमुन्याची माहीती जलद गतीने संबंधीत निरीक्षकांना व विक्रेत्यांना उपलब्ध होण्यासाठी अद्यावत संगणकीय प्रणाली विकसीत करणे.